
ओतूर : पिंपरीपेढार (ता.जुन्नर) येथील गटवाडी येथे भरदिवसा सहा तोळे सोन्याच्या दागिन्यांची सुमारे दोन लाख ३२ हजार रुपयाचा ऐवज चोरीला गेला. ही घटना मंगळवारी (ता.२४) दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास घडली. याबाबत ओतूर पोलिसात पिंपरीपेंढार येथील गटवाडीमधील अमित दत्तात्रेय कुटे यांनी तक्रार दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.