esakal | जायकाच्या प्रकल्पाला मिळणार गती - महापौर मुरलीधर मोहोळ
sakal

बोलून बातमी शोधा

Drainage water purification project

जायकाच्या प्रकल्पाला मिळणार गती - महापौर मुरलीधर मोहोळ

sakal_logo
By
प्रशांत पाटील

पुणे - 'राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत मुळा-मुठा नदीचे प्रदूषण (River Pollution) नियंत्रण करण्याच्या कामाच्या निविदा प्रक्रियेतील अटी शर्ती 'जायका'ने (JICA) मान्य केल्या आहेत. त्यामुळे या कामातील अडथळे दूर होऊन, या प्रकल्पास गती मिळणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी दिली. (Jica Project will Gain Momentum Murlidhar Mohol)

शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदी पात्रात सोडण्यासाठी बाराशे कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जपानच्या 'जायका' कंपनीने ८५० कोटी रुपये अर्थसाहाय्य केले आहे. प्रशासनाने तयार केलेल्या डीपीआरमध्ये व निविदेच्या अटी-शर्तींमध्ये अनेक चुका होत्या, त्या दूर करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या होत्या. तसेच या कामासाठी इच्छुक कंपन्यांनी केलेल्या सूचनांचाही या नव्या प्रस्तावात समावेश केला होता. या अंतिम प्रस्तावास जायका कंपनीने मान्यता दिली.

हेही वाचा: मनसेचे गतवैभव परत आणायचं; राज ठाकरे यांचे आदेश

‘या प्रकल्पाच्या कामाची साठी निविदा भरण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे. निविदा मान्य केल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. जायका कंपनीच्या नियमानुसारच सर्व पूर्तता करण्याची तांत्रिक प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे. आता लवकरच प्रत्यक्षात काम सुरू होईल. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी नदीकडे लक्ष न दिल्याने दोन्ही नद्यांच्या पाण्याने प्रदूषणाची अत्युच्च पातळी गाठली होती. मात्र आता मुळा-मुठा नद्यांचे चित्र पालटणार आहे, अशी टीकाही मोहोळ यांनी केली.

loading image