esakal | पुणे महापालिका शिवनेरीवर साकारणार जिजाऊ-शिवबाचे शिल्प
sakal

बोलून बातमी शोधा

jijau shivaji majaraj

पुणे महापालिका शिवनेरीवर साकारणार जिजाऊ-शिवबाचे शिल्प

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेने (pune corporation) पुरंदर किल्ल्यावर (purandar fort) छत्रपती संभाजी महाराज (chatrapati sambhaji maharaj) यांचा पुतळा, सिंहगडावर तानाजी मालुसरे (tanaji malusare) यांचे भित्तीशिल्प व झेंडा उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता आणखी शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबा यांचे शिल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. (Jijau shivaji maharaj Craft on Shivneri constructed Pune Municipal Corporation)

हेही वाचा: पीएमपीची निवडणूक हरली; पण सत्ताधाऱ्यांवर विरोधकांची कुरघोडी

जुन्नर (junnar) तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला, राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज यांनी युद्धकलेचे शिक्षण घेतले, त्यातूनच पुढे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या दोघांना मानवंदना देण्यासाठी महापालिकेतर्फे हे शिल्प उभारण्यात यावे असा प्रस्ताव नगरसेवक अब्दुल गफूर पठाण यांनी दिला होता. त्यास स्थायीमध्ये मान्यता देण्यात आली.

स्थायी अध्यक्ष हेमंत रासने (hemant rasane) म्हणाले, "महापालिकेतर्फे सिंहगड किल्ल्यावर २०१७ मध्ये तानाजी मालुसरे यांचे भित्तीशिल्प उभारण्यात आले आहे. पुरंदर किल्ल्यावर धर्मवीर संभाजी महाराजांचे शिल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. याच धर्तीवर शिवनेरीवर राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबाचे शिल्प उभारण्यात येणार आहे. नगरसेवकांनी हा प्रस्ताव दिला असल्याने त्यास मान्यता देण्यात आली आहे."

loading image