esakal | पीएमपीची निवडणूक हरली; पण सत्ताधाऱ्यांवर विरोधकांची कुरघोडी
sakal

बोलून बातमी शोधा

NCP and BJP

पीएमपीची निवडणूक हरली; पण सत्ताधाऱ्यांवर विरोधकांची कुरघोडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पीएमपीच्या (PMP) रिक्त झालेल्या संचालक पदाची (Director Post) निवडणूक बिन विरोध व्हावी यासाठी सत्ताधारी भाजपने (BJP) खटाटोप सुरू केला, त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना फोन करून विनंती केली. मात्र, त्याचा कोणताही परिणाम विरोधकांवर न होता निवडणूक घेण्यात आली. यामध्ये भाजपचे नगरसेवक प्रकाश ढोरे यांची बहुमताने निवड झाली. (PMP Loses Election But Oppositions Puppet Ruling Party Politics)

गेल्या महिन्यात पीएमपीचे संचालक शंकर पवार यांचा राजीनामा घेण्यावरून भाजपमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाल्याने प्रदेश पातळीवरील नेत्यांना यात लक्ष घालावे लागले होते. आज (सोमवारी) पीएमपीवर संचालक नियुक्त करण्याचा प्रस्ताव मुख्यसभे समोर आला होता. भाजपकडे बहुमत असल्याने त्यांचाच नगरसेवक संचालक म्हणून जाणार हे स्पष्ट होते. ऑनलाइन सभा असल्याने मतदानासाठी वेळ जातो, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सभागृहनेते गणेश बिडकर यांचे प्रयत्न सुरू होते. भाजपने नगरसेवक प्रकाश ढोरे यांचे नाव दिले तर, राष्ट्रवादी काँग्रेसने वनराज आंदेकर यांना संचालकपदाचा उमेदवार केला.

हेही वाचा: टेकड्यांच्या संवर्धनासाठी २६ कोटींचा निधी

त्यामुळे मतदान घेण्याची वेळ येणार असल्याने भाजपची चांगलीच धावपळ उडाली. नगरसेवकांना ऑनलाइन सभेत दाखल होण्यासाठी निरोप पाठवावे लागले. तर दुसरीकडे विरोधकांची मनधरणी करावी लागली.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी निवडणूक बिनविरोध करण्यास नकार देत असल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी अशी विनंती केली. मात्र, त्यानंतरही राष्ट्रवादीने हरलो तरी चालेल पण निवडणूक लढायची असा पवित्रा घेत कुरघोडी केली.

‘सहा महिन्यांवर महापालिकेची निवडणूक आहे, अशा स्थितीत भाजपला कोणीही विरोध करत नाही असा संदेश जाऊ देणे चुकीचे होते. त्यामुळे हरलो चालेल पण निवडणूक लढवायची अशी भूमिका घेतली.’

- प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी

‘पीएमपी संचालकपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आमचा प्रयत्न होता, त्यासाठी उमेदवार देऊ नये अशी विनंती केली होती.’

- गणेश बिडकर, सभागृहनेते, भाजप

loading image