

Nature’s Grace: Painted Stork Colony Flocks to Jiregaon Lake
Sakal
स्वराज कांबळे,
कुरकुंभ : कुरकुंभ औद्योगिक पट्ट्यापासून काही अंतरावर जिरेगाव येथील महामार्गाच्या कडेला असलेल्या तलाव परिसरात सध्या 'चित्रबलाक' (Painted Stork) पक्ष्यांचा वावर आढळून येत आहे. शांतता, सभोवताली शेती आणि घरटी बांधण्यासाठी उपलब्ध असलेली मोठी झाडे या पक्ष्यांच्या वास्तव्यासाठी पूरक आहेत. परिसरात मानवी हस्तक्षेप किंवा शिकारीची भीती नसल्यामुळे चित्रबलाक पक्ष्यांसाठी हा तलाव अत्यंत सुरक्षित अधिवास बनला आहे.