
मुंबई - विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत आल्यानंतर सुरू केलेले वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र आजही सुरु राहिले असून साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून तर पुण्याचे सध्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना जमाबंदी भूमी अभिलेख आयुक्त या पदावर नियुक्ती देण्यात आली. त्याच्याबरोबर मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती वनसचिव या पदावर तर विकास रस्तोगी यांना कृषीसचिव पदावर नियुक्ती देण्यात आली.