
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनाईजेशन (जितो) या व्यापारी संस्थेने कोरोना संकटाच्या काळातही सामाजिक बांधिलकी जपली आहे. या संस्थेने डेक्कन येथे उभारलेल्या जितो कोविड सेंटरमधून आत्तापर्यंत ४०० पेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
कोरोना रुग्णांसाठी जितो कोविड सेंटर ठरतयं भक्कम आधार
मार्केट यार्ड (पुणे) : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनाईजेशन (जितो) या व्यापारी संस्थेने कोरोना संकटाच्या काळातही सामाजिक बांधिलकी जपली आहे. या संस्थेने डेक्कन येथे उभारलेल्या जितो कोविड सेंटरमधून आत्तापर्यंत ४०० पेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
समाजाच्या विघ्नहर्ता स्वरूपाचा अभूतपूर्व जागर; ‘सकाळ’चा उपक्रम
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे औषधे आणि इतर आरोग्याच्या सुविधांबरोबरच कोविड सेंटरची (आयसोलेशन सेंटर) कमतरता निर्माण होत असल्याचे लक्षात येऊ लागले. त्यावेळी जितोच्या सक्षम शाखांनी महाराष्ट्रात चिंचवड, पिंपरी, अहमदनगर, औरंगाबाद, नागपूर, जळगाव, पुणे, इचलकरंजी, नाशिक येथे कोविड सेंटरची उभारणी करण्याचे मोठे पाऊल उचलले. जितो पुणे यांच्या सहयोगाने पहिले कोविड सेंटर पुण्यात उभारण्यात आले असल्याचे अॅपेक्स जीतोचे उपाध्यक्ष विजय भंडारी यांनी सांगितले.
खासगी क्लासेसला परवानगी मिळणार; पुणे महापालिका आखणार नवीन नियमावली
जितोच्या कोविड सेंटरमध्ये हॉस्पिटलसारखी दर्जेदार डॉक्टर्स, उत्तम ट्रीटमेंट आणि नर्सेसची सोय करण्यात आली आहे. शिवाय हॉस्पिटलचे प्रोटोकॉल, गाईडलाइन्स पाळून आवश्यक ती काळजी या सेंटरमध्ये घेतली जाते. यामध्ये उत्तम खाण्याची सोय, मनोरंजन, डायनिंग हॉल आणि आरामदायक बेड आणि स्टाफसाठी कॉन्फरन्स हॉलची सोय करण्यात आली असल्याचे जितो पुणे चॅप्टरचे अध्यक्ष कांतिलाल ओसवाल यांनी सांगितले. आजपर्यंत जितो संस्थेकडून पंच्याऐंशी लाखाहून अधिक फूड किटचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये आवश्यक औषधे, स्प्रे मशीन, पीपीई किट यांचेही वाटप केले गेले.
- आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक पेशंट बरे होऊन घरी
- सध्या १३० पेशंट दाखल आहेत.
- २०-२२ लोकांची वेटिंग लिस्ट
- डॉ. अशोक संचेती व डॉ. मांगीलाल ओसवाल यांचे नेतृत्वाखाली १२ डॉक्टरची टीम आणि ३० मेडिकल स्टाफ सेवा देत आहेत.
Web Title: Jito Covid Center Strong Base Corona Patients
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..