

हिर्डोशी, ता. १० : कारी (ता. भोर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक जिवाजी महाले यांची ३९१वी जयंती शुक्रवारी (ता. ९) साजरी करण्यात आली. यावेळी त्यांना अभिवादन करण्यात आले.
भोर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आंबवडे येथील जिवाजी महाले यांच्या समाधीस अभिवादन करण्यात आले. त्यानंतरच्या कारी येथील मुख्य कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, जिवाजी महाले व कान्होजी जेधे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. जन्माचा पाळणा झाल्यावर श्रावणी तावरे या विद्यार्थिनीने महाले यांच्या ऐतिहासिक कामगिरीविषयी व्याख्यानरूपी मनोगत व्यक्त केले. तसेच नाभिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवान बिडवे, जिल्हाध्यक्ष नीलेश पांडे, स्मारक समितीचे अध्यक्ष भगवान शिंदे, सचिव गणेश वाळुंजकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सरपंच सतीश ढेबे, नगरसेवक प्रशांत जाधव, मोहन शिंदे, दादा पालकर, महिला अध्यक्ष बेबीताई कऱ्हेकर, अंकुश खडके, राजा रायकर, स्मारक समितीचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर तावरे, नाभिक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत वाघ, विकास शिर्के आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शरद पवार यांनी केले. तर आभार दत्ता तावरे यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.