नोकरी गेलीय, उत्पन्न घटलंय? चिंता नको!

Sakal-Vidya
Sakal-Vidya

‘सकाळ’ विद्या आणि ‘एसपी फायनान्स ॲकॅडमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने खास सेमिनार
पुणे - कोरोना विषाणूच्या महासाथीमुळे सारे अर्थविश्व ढवळून निघाले आहे. दीर्घकाळ चाललेल्या लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंद्यांवर आणि पर्यायाने कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला. काहींच्या नोकऱ्या गेल्या, तर काहींच्या उत्पन्नात मोठी घट झाली. एकीकडे आर्थिक चणचण आणि दुसरीकडे उत्पन्नाचे मार्ग सापडत नसल्याने अनेकजण चिंताग्रस्त झालेले दिसतात. पण आता चिंता करण्याचे कारण नाही. ‘सकाळ’ विद्या आणि एसपी फायनान्स ॲकॅडमी आॅफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने एका खास सेमिनारचे आयोजन केले जाणार असून, त्याद्वारे भांडवली गुंतवणूक न करता अल्पकाळात उत्पन्नाचा हमखास मार्ग दाखविला जाणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

होय, ही अनोखी संधी होतकरू तरूण-तरूणी, गृहिणी, मध्यमवयीन अशा सर्व वयोगटातील मंडळींना उपलब्ध असेल. गरज असेल ती फक्त चिकाटीने शिकण्याची, उत्साहाने धडपड करण्याची आणि लोकांची नेमकी गरज ओळखून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची! यासाठी अल्पकाळ नीट शिकायचे आणि थेट उत्पन्न कमावण्यासाठी मैदानात उतरायचे, एवढेच करावे लागणार आहे. यानंतर संधींची मोठी कवाडे तुमच्यासाठी खुली होऊ शकतात.

आज पारंपरिक शिक्षण घेतल्यानंतर अनेक तरूण-तरूणी नोकरी मिळविण्याच्या मागे धडपड करताना दिसतात. पण या पारंपरिक चौकटीच्या पलीकडे जाऊन उद्योजकतेचा मार्ग शोधला तर उद्या आपणच अनेकांना नोकऱ्या देऊ शकतो, हा विचार करण्याची आज गरज आहे. समाजातील हीच गरज ओळखून ‘सकाळ’ विद्या आणि एसपी फायनान्स ॲकॅडमी आॅफ इंडिया यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. 

येत्या रविवारी (ता. १३ डिसेंबर) सायंकाळी ५ वाजता हे खास सेमिनार गणेश कला-क्रीडा मंच येथे आयोजित केले जाणार असून, त्यासाठी नावनोंदणी करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर ‘सोशल डिस्टंन्सिंग’ पाळून या सेमिनारचे आयोजन केले जाणार आहे. यामुळे जागा मर्यादित असल्याने प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

वित्तीय उद्योजकतेचा कानमंत्र
वित्तीय क्षेत्रात रोजगाराच्या आज अनेक संधी उपलब्ध आहेत. पण याची कल्पना अनेकांना नसते आणि असेल तर या संधींचा नेमका फायदा कसा करून घ्यायचा, याची माहिती नसते. आपल्या देशाची लोकसंख्या पाहता, रिअल इस्टेट, विविध प्रकारची कर्जे, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड आदी क्षेत्रात मोठा वाव असल्याचे दिसून येते. त्यामुळे केवळ नोकरीच्या मागे न धावता वित्तीय उद्योजकतेचा कानमंत्र देण्याचे एसपी फायनान्स ॲकॅडमी आॅफ इंडियाने ठरविले आहे. गेली १२ वर्षे वित्तीय क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असलेल्या एसपी एंटरप्रायझेसनेच ‘एसपी फायनान्स ॲकॅडमी आॅफ इंडिया’ची स्थापना केली आहे. ‘लर्न, अर्न अँड बी युअर बॉस’ ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून तिचे काम चालते. थोडक्यात, आधी शिकून घ्या आणि लगेच कमवायला लागा, नंतर तुमच्या कमाईला मर्यादा राहात नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. 

यामागची भक्कम प्रेरणा आहे ती एसपी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन बामगुडे यांची! शून्यातून विश्व उभे करणाऱ्या सचिन बामगुडे यांनी स्वतःच्याच रूपाने वित्तीय उद्योजकतेचा आदर्श उभा केला आहे. आज त्यांच्याच यशस्वी प्रवासाचा कानमंत्र अनेकांना स्फूर्ती आणि प्रेरणा देणारा ठरत आहे. त्यांच्याकडे शिकलेले अनेकजण आज चांगली कमाई करून वित्तीय क्षेत्रात भक्कमपणे पाय रोवून काम करताना दिसत आहेत.

पुण्यातील खास सेमिनारमध्ये स्वतः सचिन बामगुडे यांच्यासमवेत वित्तीय उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन उपस्थितांना लाभणार आहे. सध्याच्या बिकट परिस्थितीत आर्थिक उत्पन्नाचा मार्ग शोधण्याचा खास मंत्र येथे मिळणार आहे. 

कोणासाठी सेमिनार?

  • नवपदवीधर तरूण-तरूणी
  • नोकरीच्या शोधात असणारे
  • गृहिणी
  • छोटे व्यावसायिक

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com