पुणे - सैन्यदलात, पोलिस आणि तलाठी पदावर नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुण- तरुणींची फसवणूक करण्याचे सर्रास घडत आहेत. शहरातील दोन तरुणींना पोलिस आणि तलाठ्याची नोकरी देण्याच्या बहाण्याने एकाने ३० लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.