esakal | .. आणि ‘जोकर’च्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू

बोलून बातमी शोधा

.. आणि ‘जोकर’च्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू
.. आणि ‘जोकर’च्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

येरवडा - मुंढवा येथे मुक्कामी असलेल्या ‘रॅम्बो सर्कस’चे खेळ कोरोनाच्या पाश्‍वभूमीवर गेली पंचवीस दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे सर्कसच्या कलाकारांची उपासमार होत होती. याबाबत ‘आयुष्यभर हसविणाऱ्या जोकरच्या डोळ्यांत पाणी ’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ मध्ये बातमी प्रसिध्द झाली होती. या बातमीची दखल घेऊन अनेक स्वयंसेवी संस्था, दानशूर मंडळी सर्कसच्या कलाकारांना मदत करण्यासाठी सरसावले आहेत. बुधवारी रोटरी क्लब ऑफ गांधी भवन तर्फे सर्कसच्या कलाकारांसाठी दोन महिन्यांचे रेशन दिले. यावेळी सर्कसच्या मुख्य जोकर बिजू नायर यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते.

रेम्बो सर्कसचे पुणे हे माहेरघर आहे. त्यांची उपासमार होत असल्याची बातमी प्रसिद्ध होताच अनेकांनी सकाळ कार्यालयात दूरध्वनी करून कलाकारांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. यामध्ये सर्व प्रथम रोटरी क्लब गांधी भवनच्या सदस्यांनी व्हॉटस्‌अपच्या माध्यमातून संवाद साधत अवध्या अर्धातासात ७० हजार रूपये गोळा केले. दरम्यान क्लबच्या सदस्या संगिता जोशी या स्वत: सर्कसच्या कलाकारांना भेटून नेमकी काय मदत हवी याची विचारपूस करून त्यांना आवश्‍यक असणाऱ्या अन्नधान्य व वस्तूंची यादी तयार केली.

हेही वाचा: व्यावसायाच्या बहाण्याने शेतकऱ्याची साडेपाच लाखांची फसवणूक

बुधवारी रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवनचे अध्यक्ष शशांक सप्रे, सचिव मीनल धोत्रे, ज्येष्ठ सदस्य दिलीप कुंभोजकर, उज्ज्वला बर्वे यांनी मार्केट यार्डातून अेका व्यापाऱ्याकडून दोन महिन्यांचे रेशन मुख्य जोकर बीजू नायर यांच्याकडे दिले. कोरोनाच्या काळात सर्वांना मदतीची आवश्‍यकता आहे. मात्र सर्कस आणि त्यातील कलाकार हे नेहमीच स्मरणात असतात. त्यांची आठवण ह ह्रदयापासून आठवण असते. त्यामुळे अशा कलाकारांना मदतीसाठी रोटरी क्लब धावून आल्याचे बर्वे यांनी सांगितले.

कोरेगाव पार्क येथील तालेरांचीही मदत

कोरेगावपार्क येथील सुभाष तालेरा यांनी ‘सकाळ’ मधील बातमी वाचल्यानंतर सर्कस च्या आठवणी जाग्या झाल्या सांगून विद्यार्थीदशेत असताना जोकरने हसविल्याचे क्षण अजूनही मनामध्ये ताज्या आहेत. त्यांची उपासमार होत असल्यामुळे दु:ख वाटले. त्यामुळे त्यांना अन्नधान्यांची मदत केल्याचे सांगितले.