विजय यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ

विजय यांनी घेतली
सदस्यत्वाची शपथ
Published on

चेन्नई, ता. ११ (पीटीआय) : तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री जोसेफ विजय, त्यांचे नऊ मंत्री, माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी, माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी आणि विधानसभा निवडणुकीतील इतर विजयी उमेदवारांनी आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. हंगामी अध्यक्ष एम.व्ही. करुपय्या यांनी विजय यांचे नेतृत्व आणि त्यांच्या यशाचे कौतुक करत शपथविधी प्रक्रियेला सुरुवात केली.
विजय, उदयनिधी आणि काही महिन्यांपूर्वी अण्णाद्रमुक सोडून द्रमुकमध्ये आलेले माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी ‘शपथपूर्वक प्रतिज्ञा’ घेतली. तर, पलानीस्वामी, सौम्या अंबुमणी (पीएमके) यांनी ‘ईश्‍वरसाक्ष’ शपथ घेतली. अण्णाद्रमुकचे उमेदवार के. मोहन यांना शपथ घेत असतानाच अचानक रडू फुटले आणि त्यांनी दिवंगत नेत्या जे. जयललिता यांच्या नावाचा जयघोष करत हात जोडत त्यांना आदरांजली वाहिली. ‘टीव्हीके’ पक्षाच्या मंत्री एस. किर्तना यांचे नाव पुकारल्यावर त्या शपथ घेण्यासाठी जात असतानाच विधानसभा प्रधान सचिवांनी त्यांना विजयी झाल्याच्या प्रमाणपत्राची मागणी केली. किर्तना यांच्याकडे त्यावेळी प्रमाणपत्र नसल्याने त्यांना शपथ घेता आली नाही. मात्र, त्यांनी आपल्या घरून प्रमाणपत्र मागवून घेत ते सादर केले आणि आमदारकीची शपथ घेतली.
तमिळनाडू विधानसभेत एकूण २३४ जागा असल्या तरी मुख्यमंत्री जोसेफ विजय हे दोन जागांवरून निवडून आल्याने विधानसभेत प्रत्यक्षात २३३ सदस्य आहेत. दरम्यान, विजय यांनी आज द्रमुक पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची सदिच्छा भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com