पुण्यात पत्रकार पांडूरंग रायकर यांचा कोरोनाने मृत्यू 

Journalist Pandurang Raikar passed by corona in Pune
Journalist Pandurang Raikar passed by corona in Pune

पुणे : मोठा गाजावाजा करून पुण्यात जंबो कोवीड हाॅस्पीटल उभारले पण, येथील असुविधांमुळे व्यवस्थित उपचार होऊ न शकल्याने 'टीव्ही ९' चे पत्रकार पांडूरंग रायकर (वय ४२) यांचे पहाटे साडे पाच वाजता निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई वडील असा परिवार आहे. 

गेले पाच सहा महिने पुण्यात कोरोनाचे वार्तांकन करत असताना पांडूरंग रायकर यांनी काही दिवसांपूर्वी 'अँटीजन टेस्ट' केली होती. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर ते विश्रांतीनंतर ते श्रीगोंदा तालुक्यातील गावाकडे गेले होते. तेथे त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली, त्यावेळी त्यांनी पुन्हा तपासणी केली असता ही चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांनी कोपरगावच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी प्रयत्न केला तेव्हा. तेथे 40 हजार रुपये अॅडव्हान्स भरायला सांगितले होते. त्यानंतर त्यांनी पुण्यात उपचार घेण्यासाठी प्राधान्य दिले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हिंजवडी येथील एका खासगी रुग्णालयात प्रयत्न केले, पण तेथे बेड उपलब्ध नव्हता. अखेर त्यांना सोमवारी रात्री पुणे महापालिका व राज्य सरकारने उभारलेल्या शिवाजीनगर येथील जंबो हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. पांडूरंग यांची प्रकृती खालावल्याने व जंबो हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार मिळत नसल्याने त्यांचे सहकारी असलेल्या पत्रकारांनी दिवसभर व्हेंटिलेटर उपलब्ध असलेल्या बेडचा शोध सुरू केला पण बेड मिळाला नाही. अखेर मंगळवारी संध्याकाळी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कर्डियाक अँम्ब्युलन्स शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. मात्र अखेर पर्यंत त्यांना अॅम्ब्युलन्स मिळू शकली नाही. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

हे वाचा - पुण्यात भाविकांची गर्दी टाळण्यासाठी पालिका, पोलिसांचा बंदोबस्त

यंत्रणेतील समन्वयाचा अभाव, अपुऱ्या सुविधांमुळे पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.पूर्ण तयारी नव्हती तर जंबो हाॅस्पीटलच्या उद्घाटनाची गडबड केलीच का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

दीड वाजता केला शेवटचा मेसेज
पांडुरंग यांची प्रकृती खालावली होती. मध्यरात्री दीडच्या सुमारास आधी पत्रकारांच्या एका ग्रुपवर पांडूरंग यांनी "मला वाईट वाटते, मला न्या'' असा मेसेज केला होता. पत्रकारांनी त्यांना जंबोतून बाहेर काढून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात पोहचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण कुचकामी यंत्रणेमुळे योग्य उपचार मिळू न शकल्याने पहाटे मृत्यू झाला. 

 

घटनाक्रम
-  पांडुरंग रायकर यांना 20 ऑगस्टला थंडी आणि तापाचा त्रास सुरू झाला.त्यानंतर त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू केले.

- 27 ऑगस्टला त्यांनी कोरोना चाचणी केली जी निगेटिव्ह आली. 

- दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 ऑगस्टला पांडुरंग रायकर हे त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या गावी गेले. मात्र, तिथेही त्रास सुरू होता त्यामुळं त्यांची कोपरगावमध्ये अँटीजेन टेस्ट करण्यात आली जी पॉझिटीव्ह आली. 

- रविवारी 30 ऑगस्टला रात्री त्यांना अँम्ब्युलन्समधून उपचारांसाठी पुण्यात आण्यात आलं आणि पुण्यातील पत्रकारांनी त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने रायकर यांना जंबो हॉस्पिटलमध्ये भरती केले. जंबो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर 'आयसीयु'मध्ये उपचार सुरू होते. मात्र, त्यांची परिस्थिती खालावत होती. त्यामुळं त्यांना दुसऱ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचे प्रयत्न पुण्यातील पत्रकारांनी सुरू केले.  

- मंगळवारी रात्री 2 सप्टेंबर त्यांची ऑक्सिजन पातळी 78 पर्यंत खाली गेली. त्यांना जंबो हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी कार्डिअॅक अँम्ब्युलन्सची गरज होती. अशी अँम्ब्युलन्स मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. रात्री अकरा वाजता अँम्ब्युलन्स जंबो हॉस्पिटलला पोहचली पण, त्यामधील व्हेंटीलेटर खराब झाला असल्याचं सांगितलं गेलं. त्यानंतर दुसरी एम्ब्युलन्स मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते पण, त्या अँम्ब्युलन्समध्ये डॉक्टर उपलब्ध नव्हते. तोपर्यंत बारा- सव्वाबारा वाजले होते. पहाटे चारला अँम्ब्युलन्स मिळवण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू झाला पण, तोपर्यंत पांडुरंगची प्रकृती आणखी खालावली होती. 

- दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून पहाटे पाच वाजता अँम्ब्युलन्स उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आणि आयसीयुमधील डॉक्टरांचा आम्ही निघतो आहोत असा फोन आला. पांडुरंगचे मित्र असलेले पत्रकार आणि त्याचे नातेवाईक जंबो हॉस्पिटलला पोहचले आणि डॉक्टरांनी साडेपाच वाजता त्याचं निधन झाल्याचं सांगितलं.  थोड्याच वेळात कार्डिअॅक अँम्ब्युलन्स जंबो हॉस्पिटलला पोहचली पण, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com