‘जम्बो कोविड’चे अखेर ‘शटडाऊन’ 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 January 2021

‘जम्बो’त उपचाराच्या सर्व सुविधा जागेवर राहणार असून, कोरोनाचा संसर्ग वाढल्यास रुग्णांना पुन्हा दाखल करून घेतले जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. 

पुणे - कोरोनाच्या साथीत गरीब रुग्णांवर मोफत उपचारासाठी उभारलेल्या पुण्यातील जम्बो कोविड केअर सेंटरचे सोमवारी (ता.१८) अखेर ‘शटडाऊन’ झाले आहे. उपचारानंतर शेवटच्या रुग्णाला सोडण्यात आले. मात्र, ‘जम्बो’त उपचाराच्या सर्व सुविधा जागेवर राहणार असून, कोरोनाचा संसर्ग वाढल्यास रुग्णांना पुन्हा दाखल करून घेतले जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. 

PSI महिला अधिकाऱ्याशी लव्ह मॅटर; पोलिस शिपायाने ठाण्याच्या टेरेसवरुनच मारली उडी​

पुणे येथील शिवाजीनगरमधील शासकीय आभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) आवारात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे १ हजार ६०० बेडच्या क्षमतेचे जम्बो कोविड केअर सेंटर उभारले होते. पहिल्या टप्प्या सहा महिन्यांसाठी ही सुविधा उपलब्ध केली होती. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात उघडलेल्या ‘सीओईपी’च्या आवारातील जम्बोची मुदत संपली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाची साथही ओसरत असल्याचे नव्या रुग्णांच्या आकडेवारी स्पष्ट झाले आहे. त्यातही आठशे बेडची क्षमता असलेल्या जम्बोत शेवटच्या टप्प्यात शंभर-सव्वाशेच रुग्ण दाखल होते. दुसरीकडे, कमी रुग्ण असूनही सर्व बेडच्या देखभाली खर्च ‘एजन्सी’ देणे शक्‍य नसल्याचे तुर्तात तरी ही सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी गेल्या महिन्यांत घेतला होता. त्यानुसार एक जानेवारीपासून नव्या रुग्णांना दाखल करून घेण्यात आले नाही. तेव्हा उपचार घेणारे रुग्ण बरे झाल्यानंतर जम्बो बंद करण्यात येईल, असेही राव यांनी सांगितले होते. त्यानुसार शनिवारी शेवटचा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या जम्बोतील उपचार थांबविण्यात आले असून, पुढील काळात कोरोनाचे रुग्ण वाढल्यास ते पुन्हा सुरू केले जातील. त्यासाठी जम्बोतील उपचाराची यंत्रणा जागेवरच कायम असेल. त्याठिकाणी सध्या लसीकरण केंद्र आहे. 
राजेंद्र मुठे, समन्वयक, जम्बो कोविड केअर सेंटर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jumbo Covid Care Center in Pune was finally shut down