'Frozen Eyes'वर यशस्वी शस्त्रक्रिया, 30 वर्षांनी जुनैदला दृष्टी

आपण चालताना समोरचं सहज बघू शकतो. जुनैदला मात्र समोरचं बघण्यासाठी उजव्या खांद्यावर अक्षरशः डोकं टेकवावं लागायचं. अशा स्थितीत तो आयुष्याची तब्बल ३० वर्षे जगलेला.
Eyes
EyesSakal

पुणे - आपण चालताना समोरचं सहज बघू शकतो. जुनैदला (Junaid) मात्र समोरचं बघण्यासाठी उजव्या खांद्यावर अक्षरशः डोकं टेकवावं लागायचं. अशा स्थितीत तो आयुष्याची (Life) तब्बल ३० वर्षे जगलेला. अर्थात त्याचा गंभीर परिणाम (Effect) त्याच्या मानेवर आणि मणक्यावर झाला. त्याच्या या आजाराचं (Sickness) कारण होतं त्याचे ‘गोठलेले डोळे’ (फ्रोझन आय). (Frozen Eye) पुण्यातील नेत्रतज्ज्ञांनी केलेल्या यशस्वी उपचारातून जुनैदला त्याची नैसर्गिक डोळे (Natural Eye) परत मिळाले. (Junaid Eye Treatment See Success)

या विकाराला वैद्यकीय परिभाषेत ‘कॉँन्जेनायटल फायब्रोसिस ऑफ द एक्स्ट्राओक्युलर मसल्स’ (सीएफईओएम) म्हटले जाते. या आजारात रुग्णाच्या डोळ्याची ठेवणं जन्मतः वेगळी असते. त्यामुळे ते इतर सामान्य माणसांप्रमाणे डोळ्यांची हालचाल करू शकत नाहीत. बहुतांश वेळा रुग्णांना समोर पाहण्याची मान आणि डोकं विशिष्ट कोनात वळवावे लागते. त्याच प्रकारे जुनैद आपलं डोकं उजव्या खांद्यावर टेकवून समोर बघत असे.

Eyes
डीएसके प्रकरण : शिरीष कुलकर्णी यांचा जामीनासाठी अर्ज

वर्षभरापूर्वी जुनैद पुण्यातील ‘राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्थे’त (एनआयओ) उपचारासाठी आला. ‘एनआयओ’च्या संचालक नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. जाई केळकर यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. अत्यंत गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया दोन तास सुरू होती. या शस्त्रक्रियेनंतर जुनैद त्याच्या आयुष्यात प्रथमच डोकं सरळ ठेऊन पुढे बघू शकला.

डॉ. केळकर म्हणाल्या, ‘डोळ्याची हालचाल पूर्ववत करणे हा या शस्त्रक्रियेचा उद्देश नव्हता. किंबहुने ती अपेक्षाही ठेवली नव्हती. जुनैद ज्या ओझ्याखाली तीस वर्षे जगलाय त्याचे ते ओझे हलके करणे, हा शस्त्रक्रियेचा उद्देश होता.’

गोठलेले डोळे म्हणजे काय?

गोठलेले डोळे हा अत्यंत दुर्मिळ जन्मतः असलेला नेत्रदोष आहे. जगभरात सुमारे दोन लाख ३० हजार जणांमध्ये एखाद्याला हा आजार होतो. यात दोन्ही डोळ्यांचे स्नायू स्थिर होतात. त्यामुळे जुनैदमध्ये दोन्ही डोळ्यांची नजर वेगवेगळ्या दिशांना होती. त्यामुळे तो सामान्य माणसांप्रमाणे सरळ बघू शकत नव्हता.

Eyes
नाश्ता देतो सांगून अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

असा केला उपचार

  • रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी ‘एमआरआय’च्या माध्यमातून डोळ्यातील स्नायूंची स्थिती अभ्यासण्यात आली

  • त्यात रुग्णाचे स्नायू खूप लगणल्याचे दिसले

  • त्यात नैसर्गिक लवचिकता नव्हती

  • त्यामुळे रुग्णाला डोळ्यांची हालचाल करताच येत नव्हती

  • दोन्ही डोळे वेगवेगळ्या दिशांना स्थिर झाले

  • ही शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णाला संपूर्ण भूल देण्यात आली

  • डोळ्यांचे स्नायूंचे ग्लोबवर प्लास्टर करण्यात आले

स्नायूंना डोळ्याच्या खोबणीत बसविण्यासाठी आम्ही विशेष प्रकारची शिवण वापरली. त्या माध्यमातून दोन्ही डोळे सारखे करण्यात यश आले.

- डॉ. जाई केळकर, नेत्ररोग तज्ज्ञ, एनआयओ

या शस्त्रक्रियेमुळे माझे जीवन पूर्णपणे बदलले आहे. प्रथमच मला सरळ पाहता आलं. त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं म्हणजे मी डोकं सरळ ठेऊन पुढे बघत चालू शकलो. या पद्धतीने जन्मापासून मी कधीच केलं नव्हतं.

- जुनैद, रुग्ण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com