राज्यातील महाविद्यालयांची माहिती 'ऑनलाइन' उपलब्ध व्हावी; शिक्षणमंत्र्यांकडे कुणी केली मागणी?

Students_Admission
Students_Admission

पुणे : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती जाणून घेण्यासाठी घराबाहेर पडणे, या परिस्थितीत तरी पालकांना अशक्य आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने राज्यातील सर्व आणि विशेषत: ऑनलाइन प्रक्रियेद्वारे प्रवेश होणाऱ्या महाविद्यालयांची पूर्ण माहिती प्राधान्याने उपलब्ध व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने केले जात आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांना तसेच कित्येक पालकांना कनिष्ठ महाविद्यालयांची पुरेशी माहिती नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे दरवर्षी कित्येक पालक प्रवेश अर्ज सादर करण्यापूर्वी शाळा-महाविद्यालयांना भेटी देऊन तेथील परिस्थिती, भौतिक सुविधा, अध्यापक वर्ग, फी, परिसर, तेथे चालणारे विविध उपक्रम जाणून घेत असतात आणि त्यानंतर अर्ज भरताना महाविद्यालयाची निवड करीत असतात.

यावर्षी कोरोनामुळे घराबाहेर पडून शाळा-महाविद्यालयांना भेटी देणे अशक्य आहे. दहावीच्या निकालास अजून किमान काही आठवड्यांचा कालावधी आहे. या काळात सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या वेबसाईटस् अद्ययावत कराव्यात, तेथील भौतिक सुविधा- वर्गखोल्या, वाचनालय, प्रयोगशाळा, क्रीडांगण, पिण्याच्या पाण्याची तसेच इतर सुविधा, गेल्या पाच ते दहा वर्षांचा वर्गवारीसह निकाल, अभ्यासेतर उपक्रम व त्यातील यश, फी व इतर खर्च, शिक्षक वर्ग- त्यांची शैक्षणिक पात्रता व अनुभव, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपलब्धता इत्यादीची माहिती वेबसाईटवर उपलब्ध असावी. 

जेणेकरून पालक आणि विद्यार्थी उचित निवड करू शकतील आणि शासनाससुध्दा ही माहिती उपलब्ध होईल. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेतील पारदर्शकता वाढेल आणि तक्रारी कमी होतील, असे शिक्षक महासंघाचे समन्वयक आणि मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सरचिटणीस प्रा. मुकुंद आंधळकर यांनी निवेदनाद्वारे सूचविले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com