

Heavy rainfall in Junnar's tribal region triggered a landslide at Inglun Ghat, temporarily disrupting traffic.
Sakal
जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात शनिवार ता 4 रोजी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. जून महिना सरला तरी पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांपुढे पेरणीचे उभे संकट ठाकले होते मात्र गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे आदिवासी भागासह अन्य ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने जुन्नरच्या आदिवासी भागातील शेवटचे टोक असलेल्या आंबे व हातवीज या गावांकडे जाणाऱ्या इंगळून घाटामध्ये डोंगराचा काही भाग खचल्याने राडारोडा मुख्य रस्त्यावर आल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी घटनास्थळी भेट देत स्थानिक नागरिक व प्रशासनाच्या मदतीने हा राडारोडा हटवून वाहतूक एकमार्गी सुरू केली.