Dilip Walse Patil
Dilip Walse PatilSakal

Manchar News : हिरडा पीक नुकसान भरपाईचा प्रस्ताव पुणे जिल्हा प्रशासनाने तात्काळ पाठवावा - सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील

'आंबेगाव व जुन्नर तालुक्यात जून २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळाने हिरडा पिकाचे नुकसान झाले होते.

मंचर - 'आंबेगाव व जुन्नर तालुक्यात जून २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळाने हिरडा पिकाचे नुकसान झाले होते. संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात सुधारित प्रस्ताव पुणे जिल्हा प्रशासनाने तात्काळ पाठवावा.”असे निर्देश शुक्रवारी (ता.१६) राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

'दरम्यान सदर प्रस्ताव प्राप्त होताच तो मंत्रिमंडळासमोर ठेवून मदतीबाबतचा निर्णय घेण्यात येईल.' अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी दिली.

मुंबई मंत्रालयात शुक्रवारी वळसे पाटील यांनी जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील हिरडा उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने बैठक घेतली. यावेळी मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे उपस्थित होते. पुण्याहून कृषी आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, उपवन संरक्षक प्रवीण सिंग आदी अधिकारी ऑनलाईनद्वारे उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले, 'शेतकऱ्यांच्या हिरडा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यावेळी पंचनामे ही करण्यात आले. मात्र, अद्याप त्यांना मदत मिळालेली नाही. ही मदत त्यांना मिळावी, यादृष्टीने त्या शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि त्यावेळचा हिरडा पिकाचा बाजारभाव लक्षात घेऊन कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने मदतीसाठी प्रस्ताव तत्काळ सादर करावा.'

'जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील बाधित गावांची संख्या ८१ असून शेतकरी संख्या ४१८९ इतकी आहे. केंद्राच्या आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमध्ये याबाबत मदत करण्यास अडचण येत असल्यास विशेष बाब म्हणून लवकरच निर्णय घेतला जाईल.

हिरडा नुकसान भरपाईचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल. मान्यता घेऊन या शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत केली जाईल.

येत्या सोमवार (ता. १९) पर्यंत याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने मंत्रालयात मदत व पुनर्वसन विभागाला सादर करावा.' असे अनिल पाटील यांनी सांगितले. दरम्यान यावेळी झालेल्या चर्चेत आदिवासी समाजाचे नेते सुभाषराव मोरमारे, संजय गवारी, प्रकाशराव घोलप आदी शेतकऱ्यांनी भाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com