

Rare Egyptian Vulture Sighted in Junnar
Sakal
पिंपळवंडी : जुन्नर तालुक्यामध्ये ‘नियोफ्रॉन’ जातकुळातील दुर्मीळ पांढरे गिधाड (इजिप्शियन गिधाड) रविवारी (ता. २६ ऑक्टोबर) आढळले. त्यामुळे निसर्ग अभ्यासक आणि पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्वी हजारोंच्या संख्येने आढळून येणारी गिधाडे सन १९९० च्या दशकानंतर मात्र झपाट्याने कमी होत गेली. आता त्यांची संख्या चिंताजनक असल्याचे आंतरराष्ट्रीय निसर्ग संघटनेच्या (आययुसीएन) अहवालानुसार दिसून येत आहे.