जुन्नर बाजार समितीचा शरदचंद्रजी पवार भोजन थाळीचा उपक्रम स्तुत्य: उपमुख्यमंत्री पवार

शेतकरी, व्यापारी, कामगार यांच्यासाठी जुन्नर बाजार समितीने नारायणगाव येथील उपबजारात सुरू केलेला शरदचंद्रजी पवार भोजन थाळी अंतर्गत चाळीस रुपयांत पोटभर जेवण उपक्रम
Junnar Bazar Samiti Sharad Chandraji Pawar bhojan thali initiative  for farmer trader worker ajit Pawar Narayangaon
Junnar Bazar Samiti Sharad Chandraji Pawar bhojan thali initiative for farmer trader worker ajit Pawar Narayangaonsakal

नारायणगाव : शेतकरी, व्यापारी, कामगार यांच्यासाठी जुन्नर बाजार समितीने नारायणगाव (ता.जुन्नर) येथील उपबजारात सुरू केलेला शरदचंद्रजी पवार भोजन थाळी अंतर्गत चाळीस रुपयांत पोटभर जेवण हा उपक्रम स्तुत्य आहे.असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.शेतकरी हिताचा या उपक्रम सुरू केल्या बद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभापती संजय काळे यांचे या वेळी अभिनंदन केले.

जुन्नर बाजार समितीने नारायणगाव उपबजारात सुरू केलेल्या शरदचंद्रजी पवार भोजन थाळीचा शुभारंभ आज(ता.२२) दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. या निमित्ताने येथील उपबजारात आयोजित कार्यक्रमास आमदार अतुल बेनके, उपसभापती दिलीप डुंबरे, जेष्ठ संचालक निवृत्ती काळे, धनेश संचेती, प्रकाश ताजणे , संतोष घोगरे ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, अध्यक्ष प्रकाश पाटे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, शरद लेंडे, मोहित ढमाले, गुलाबराव नेरकर, विनायक तांबे, तुळशीराम शिंदे, बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे , उपसचिव शरद घोंगडे आदी उपस्थित होते. या वेळी तयार केलेल्या थाळीची पहाणी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली, कोणता तांदूळ वापरता, किती भाज्या देणार, या भोजन थाळीची किंमत काय आदींची माहिती सभापती काळे यांच्याकडून त्यांनी घेतली.

सभापती काळे म्हणाले बाजार समितीचे संस्थापक, माजी आमदार शिवाजीराव काळे यांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या हस्ते झाले.त्या वेळी बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी अल्पदरात भोजन थाळी उपक्रम सुरू करण्याचे जाहीर केले होते. त्या नुसार नारायणगाव उपबजारात हा उपक्रम आज पासून सुरू केला आहे. या उपक्रमा अंतर्गत शेतकरी, व्यापारी, कामगार यांना चाळीस रुपयांत रुचकर पूर्ण भोजन देण्यात येणार आहे.भोजन थाळीत भात, डाळ, चपात्या, दोन भाज्या, चटणी, लोणचे आदी पदार्थ असणार आहेत. या साठी कोलम तांदूळ वापरण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या या उपक्रमाचे उपमुख्यमंत्री पवार यांनी कौतुक केले.याच धर्तीवर जिल्ह्यातील इतर सात बाजार समितीत हा उपक्रम सुरू करता येईल का या बाबत माहिती घेऊ.असे मत या वेळी त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे नियोजन बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे , उपसचिव शरद घोंगडे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com