Leopard Attack : बिबट्याचा हल्ल्यात जुन्नरला मुलाचा मृत्यू ; काळवाडी येथे घटना, आईने फोडला टोहो

काळवाडी (ता. जुन्नर) येथील काळेस्थळ वस्ती शिवारात बुधवारी (ता. ८) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात रुद्र महेश फापाळे या आठवर्षीय बालकाचा मृत्यू झाला. बदगी बेलापूर येथील फापाळे हे यात्रेनिमित्त काळवाडी येथे त्यांचे नातेवाईक रोहिदास गेनभाऊ काकडे यांच्याकडे आले होते.
Leopard Attack
Leopard Attacksakal

पिंपळवंडी : काळवाडी (ता. जुन्नर) येथील काळेस्थळ वस्ती शिवारात बुधवारी (ता. ८) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात रुद्र महेश फापाळे या आठवर्षीय बालकाचा मृत्यू झाला. बदगी बेलापूर येथील फापाळे हे यात्रेनिमित्त काळवाडी येथे त्यांचे नातेवाईक रोहिदास गेनभाऊ काकडे यांच्याकडे आले होते.

रुद्रची आई काल पुन्हा आपल्या गावी गेली असता दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी ही घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा मृत्युमुखी पडल्याने त्याची आई भाग्यश्री फापाळे यांनी टाहो फोडला. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास रुद्र हा घराजवळ खेळत होता. घराच्या बाजूला असणाऱ्या गोठ्याजवळ रुद्र जात असताना अचानक बिबट्याने येऊन हल्ला केला व त्याला उचलून घेऊन गेला. बाजूच्या उसाच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. सदर घटनेची माहिती वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान, काळवाडी व परिसरातील ग्रामस्थांचा मोठा उद्रेक झालेला असून. बिबट्याचे हल्ले थांबविण्यासाठी वनविभाग तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी यावेळी ग्रामस्थ करत आहेत. दोन दिवसांपूर्वी पिंपळवंडी येथील एका तरुणीवर बिबट्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते.

उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले की, या परिसरात १० पिंजरे लावले आहेत. अजून २० पिंजरे लावण्यात येणार आहेत तसेच ड्रोनद्वारे देखील बिबट्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. अगदी घराजवळ उसाचे क्षेत्र असता कामा नये. शेतात घर असल्यास त्याला कुंपण असणे गरजेचे आहे. घरातील लहान मुलांवर नेहमी लक्ष द्यावे.

दरम्यान, बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या मागणीला जुन्न तालुक्यात जोर वाढला आहे.

बिबट्याला पकडण्यासाठी काळवाडी येथे पिंजरा लावावा, अशी मागणी वनविभागाला केली होती. वनविभागाने बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण रोखण्यासाठी उपाय करणे गरजेचे.

- तुषार वामन, सरपंच, काळवाडी

शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळीदेखील शेतात जावे लागते. यावर उपाय करणे गरजेचे. बिबट्याच्या भीतीमुळे ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत. बिबट्याची दहशत आता किती दिवस सहन करावी लागणार.

-अजय बेल्हेकर, शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com