esakal | जुन्नरमधील नागरिकांवर दहा दिवस आहेत ही बंधने 
sakal

बोलून बातमी शोधा

lock down

नागरिकांचे घरोघरी भेटी देऊन दररोज सर्वेक्षण करण्यात येणार असून, संशयित रुग्णांची यादी तयार करण्यात येणार आहे. त्यांना घरात विलगिकरण केले जाणार आहे.

जुन्नरमधील नागरिकांवर दहा दिवस आहेत ही बंधने 

sakal_logo
By
दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : जुन्नर शहर व परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जुन्नर शहर दहा दिवसांसाठी येत्या सोमवारपर्यंत (ता. २० जुलै) प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी दिली.

आणखी वाचा - इस्लामिक स्टेटचं पुण्यात कनेक्शन, तिघांना अटक 

जुन्नर शहरात आजअखेर कोरोनाबाधित सात रुग्ण आढळून आले. त्यापैकी एक बरा झाला असून, सहा जण उपचार घेत आहेत. परिसरातील बारव, खानगाव, कुसूर, निरगुडे, येणेरे, माणिकडोह, सावरगाव, शिरोली बुद्रुक येथे देखील रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जुन्नर शहर केंद्रस्थानी ठेवून पाच किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या परिसरातील नागरिकांचे घरोघरी भेटी देऊन दररोज सर्वेक्षण करण्यात येणार असून, संशयित रुग्णांची यादी तयार करण्यात येणार आहे. त्यांना घरात विलगिकरण केले जाणार आहे. तसेच, सौम्य व तीव्र स्वरूपाची लक्षणे असणाऱ्यांची वर्गवारी करण्यात येणार आहे. याबाबत सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी पोलिस, महसूल, आरोग्य व नगरपालिका प्रशासनास आदेश दिले आहेत. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून गावात येणारे सर्व रस्ते बंद राहणार आहेत.
 
Edited by : Nilesh Shende

loading image