जुन्नरला कोरोना संशयिताचा मृत्यू, सहा जणांचे अहवाल...

corona
corona

पुणे : मुंबईहून जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे आलेल्या एका व्यक्तीला रविवारी त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. डॉक्‍टरांनी त्यांना संशयित कोरोना म्हणून घोषित केले आहे. तसेच, मांजरवाडी (ता. जुन्नर) येथील विवाहिता कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने जुन्नर तालुक्यातील रुग्णांची संख्या सात झाली आहे.मुंबईहून जुन्नरला आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोना तपासणीसाठी पुण्याला पाठविले होते. त्यापैकी तिघांचे अहवाल 21 मे रोजी निगेटिव्ह आले होते. त्यानंतर उरलेल्या दोघांचे अहवाल देखील निगेटिव्ह आले 

पिंपळवंडी  : मुंबईहून जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे आलेल्या एका व्यक्तीला रविवारी त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. डॉक्‍टरांनी त्यांना संशयित कोरोना म्हणून घोषित केले आहे.

सदर व्यक्ती प्रशासनाच्या परवानगीने पिंपळवंडी येथील घरातच होम क्वारंटाइन होती. रविवारी दुपारी त्यांच्या छातीत दुखत असल्याने व श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असून त्यांचा रिपोर्ट तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. नागरिकांनी घाबरून न जाता संयम पाळावा, असे आवाहन आळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.या घटनेची माहिती आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर, आळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या घराचा परिसर सील केला. याबाबत डॉ. पाटील यांनी सांगितले की, मयत व्यक्ती ही मुंबईमधील रेडझोन विभागातून आली असल्याने व त्यांचा होम क्वरंटाइन कालावधी संपला नसल्याने त्यांना मृत कोरोना संशयित म्हणून ग्राह्य धरण्यात आले आहे. 

नारायणगाव : मांजरवाडी (ता. जुन्नर) येथील विवाहिता कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने जुन्नर तालुक्यातील रुग्णांची संख्या सात झाली आहे.ही महिला मुंबईतून आली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली. मुंबईतून बस्ती सावरगाव येथे आलेले दांपत्य व धोलवड येथील चार जण गेल्या दोन दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

जुन्नर : मुंबईहून जुन्नरला आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले. यामुळे गेले सात दिवस चिंतेत पडलेले नागरिक व प्रशासनाने सोमवारी नि:श्‍वास सोडला आहे.

मुंबईहून जुन्नरला आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोना तपासणीसाठी पुण्याला पाठविले होते. त्यापैकी तिघांचे अहवाल 21 मे रोजी निगेटिव्ह आले होते. त्यानंतर उरलेल्या दोघांचे अहवाल देखील निगेटिव्ह आले असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ.जयश्री काटकर व आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत खत्री यांनी दिली.

मुंबईहून जुन्नरला 14 मे रोजी पाच जणांचे कुटुंब राहण्यासाठी आले. त्यांना घरात "होम क्वारंटाइन' करण्यात आले होते. त्याच्या घरातील एक मुंबईला कोरोनाबाधित आढळून आल्याने येथील पाचही जणांना तीन रुग्णवाहिकेतून 19 मे रोजी तपासणीसाठी पुण्यात नेण्यात आले होते. यामुळे गावातील नागरिक चिंतेत पडले होते. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने नागरिकांची चिंता दूर झाली आहे. त्या सर्वांना संस्था क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com