

Pune Municipal Corporation
Sakal
पुणे : महापालिकेने शहरातील पाच रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर सशुल्क पार्किंग सुरु करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. सध्या तांत्रिक प्रक्रिया सुरू असून नोव्हेंबरमध्ये ती पूर्ण होईल. त्यानंतर महापालिकेकडून पुढील महिन्यापासून सशुल्क पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरेदी व विविध कामानिमित्त मध्यवर्ती भागात येणाऱ्या नागरिकांची वाहने लावण्याची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे.