

Tragic Incident in Junnar
sakal
जुन्नर : बारव ता. जुन्नर येथे भावाने दारू पिऊ नको असे सांगितल्याच्या कारणावरून भावाशी हुज्जत व वाद घालत युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार ता. 6 रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास घडली. प्रविण हरिभाऊ उंडे वय 33 वर्ष रा. बारव ता. जुन्नर असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेची फिर्याद सागर हरिभाऊ उंडे यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात दिली आहे.