

Maharashtra Farmers Earn Rs 2 Point 6 Lakh Profit From Potato Farming on Two Acres Using Organic Manure and Drip Irrigation
sakal
खोडद : पाण्याचे नियोजन... तंत्रज्ञानाचा वापर... कंपोस्ट खत... कोंबड खत... शेणखताचा वापर करून मांजरवाडी (ता. जुन्नर) येथील बेलशेत मळ्यातील शेतकरी दत्तात्रेय बाळू थोरात व शार्दुल बाळू थोरात या दोन भावांनी दोन एकर क्षेत्रात २० टन बटाट्याचे उत्पादन घेतले आहे. यातून चार लाख १० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे थोरात यांना तीन महिन्यांत दोन लाख ६० हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.