Leopard Caught
sakal
मंचर - आंबेगाव, खेड, जुन्नर आणि शिरूर तालुक्यांमध्ये गेल्या काही महिन्यांत बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे व दहशतीमुळे निर्माण झालेली भीती आता काही प्रमाणातहळूहळू कमी होताना दिसत आहे. पण दहशत कायम असल्याने या भागातील नागरिक अलर्ट आहेत. एकेकाळी दररोजच्या हल्ल्यांमुळे शेतात जाणे, सायंकाळनंतर घराबाहेर पडणे, तसेच विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करणेही धोकादायक झाले होते.