द्राक्ष शेती नुकसान : डॉ. अमोल कोल्हेंच्या संसदेत विविध मागण्या

विविध मागण्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज ता.१४ रोजी संसदेत केल्या.
डॉ. अमोल कोल्हे
डॉ. अमोल कोल्हेSakal

जुन्नर : अवकाळी पावसामुळे (Heavy Rain)नुकसान झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना (Grapes Producer Farmer) दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत. यासह विविध मागण्या खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आज ता.१४ रोजी संसदेत केल्या. जागतिक बाजारपेठेत निर्धारित वेळेत द्राक्ष पोचण्यासाठी सर्व शिपिंग लाईन्सची बैठक बोलावून द्राक्षाच्या कन्टेनर्ससाठी जहाजांवर पुरेशी जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी यावेळी खासदार डॉ. कोल्हे यांनी केली.

शिरूर लोकसभा मतदारसंघात द्राक्षाचे मोठे उत्पादन घेतले जाते. मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचे सांगून खासदार डॉ. कोल्हे यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज संसदेत पोचवला.

डॉ. अमोल कोल्हे
मोदींची 12 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, काय घडले बैठकीत ?

द्राक्ष निर्यातीसाठी शिपिंग कंपन्या कन्टेनर्ससाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देत नाहीत, परिणामी द्राक्ष वेळेत जागतिक बाजारपेठेत पोहोचू शकत नाहीत. त्याचा शेतकऱ्यांना फटका बसतो याकडेही त्यांनी लक्ष वेधले व यातून मार्ग काढण्याची मागणी केली. त्याचबरोबर मालवाहतूक दरात प्रचंड वाढ होत आहे, त्यावर नियंत्रण आणण्याची तसेच प्रत्येक कन्टेनरमागे अडीच लक्ष रुपये अनुदान देण्याची मागणीही खासदार डॉ. कोल्हे यांनी केली आहे.

शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना केंद्र सरकार विशेष कृषी योजनेंतर्गत ७ टक्के विशेष अनुदान दिले जात होते. हे अनुदान ३ टक्क्यांवर आणण्यात आले आहे, याकडे लक्ष वेधून हे अनुदान वाढविण्याची मागणी डॉ. कोल्हे यांनी केली.

डॉ. अमोल कोल्हे
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली 'या' योजनेविषयी मोठी मागणी

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याच्या मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर करीत खासदार डॉ. कोल्हे यांनी सध्या द्राक्ष हंगाम सहा महिने आहे तो ९ महिने होण्यासाठी प्लॅस्टिक आच्छादनाची गरज आहे, त्यावरील आयात शुल्क कमी करण्याच्या मागणी बरोबरच केवळ युरोपची द्राक्षाची मागणी २५ लाख मेट्रिक टन असताना आपला देश केवळ १ लाख मेट्रिक टन द्राक्ष निर्यात करु शकतो या वास्तवाकडे संसदेचे लक्ष वेधून द्राक्ष निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी डॉ. कोल्हे यांनी यावेळी बोलताना केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com