

Several villages lost road connectivity after landslides and overflowing streams, while authorities shifted residents from vulnerable areas.
Sakal
जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागाला मंगळवार ता . 7 च्या सायंकाळपासून ते बुधवार ता. 8 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत या कालावधीत मुसळधार पावसाने झोडपले. मुसळधार पावसामुळे जनजीवन अक्षरशा विस्कळीत झाले. आदिवासी भागातील बहुतांशी ठिकाणी रस्ते, पूल सकाळच्या सत्रात पाण्याखाली गेल्याचे चित्र होते. आदिवासी भागातील आंबे, हातवीज, हिवरे पठार व सुकाळवेढे या गावांकडे जाण्यासाठी महत्वाचा असलेला इंगळून घाटात चार ते पाच ठिकाणी दरड कोसळल्याने घाटरस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद झाला होता. दुपारनंतर प्रशासनाने सदरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. तर भिवाडे, तळमाची या ठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता असल्याने या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले असल्याची माहिती तहसीलदार रणजीत भोसले यांनी दिली.