

Pune Junnar Hostel Missing Case Three Minor Students Untraced For 18 Days Police Appeal For Information
esakal
-मिननाथ पानसरे
जुन्नर: येथील नामांकित शिक्षण संस्थेच्या वसतिगृहातील तीन विद्यार्थी गेल्या अठरा दिवसांहून अधिक कालावधीपासून बेपत्ता असल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. ओंकार नामदेव माळी, वय 16 वर्षे, सौरव दत्तू डामसे वय 15 वर्षे, ज्ञानेश्वर बुधा दाभाडे वय 14 वर्षे हे विद्यार्थी बेपत्ता झाले आहेत.