Pune लक्ष्मीपूजनाला सातवाहन काळातील दुर्मिळ नाण्यांच्या पूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

Pune : लक्ष्मीपूजनाला सातवाहन काळातील दुर्मिळ नाण्यांच्या पूजन

जुन्नर : इतिहास अभ्यासक व ऐतिहासिक वस्तू संग्राहक बापूजी ताम्हाणे यांनी गोळेगाव ता.जुन्नर येथील आपल्या जुन्या नाण्यांच्या संग्रहात दाखल झालेल्या सातवाहन काळातील दुर्मिळ नाण्याचे पूजन करून लक्ष्मीपूजन साजरे केले.

दिपावलीच्या शुभमुहूर्तावर लक्ष्मी स्वरूपात जुन्नरच्या सातवाहन काळातील बाजारपेठेत चलनात असणारी सात नाणी ताम्हाणे यांच्या दुर्मिळ नाणी संग्रहात दाखल झाली. ह्या ऐतिहासिक महत्वपूर्ण नाण्याची पुजा करुन ही नाणी आपल्या संग्रहात दाखल होत असल्याचा आनंद वाटत असल्याचे ताम्हाणे यांनी सांगितले.

ही नाणी मिळविण्यासाठी पत्नी सुवर्णा हिने शेतमजूरीच्या मिळालेल्या पैशाची आर्थिक मदत केली. हा संग्रह माझा एकट्याचा नसून माझ्या कुटुंबातील सदस्याचा आहे अशी भावना ताम्हाणे यांनी व्यक्त केली.