

Leopard Terror in Junnar Third Attack on Bike Rider in a Month Sparks Fear Among Residents and Concerns for School Children
esakal
-राजेश कणसे
आळेफाटा : बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील ठाकरवाडी जवळील कॅनॉल परिसरात दुचाकीवरून घरी जात असलेल्या नितीन उमाजी जाधव यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात जाधव यांच्या पायाला दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी नारायणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिनाभरात दुचाकीस्वारांवर बिबट्याने हल्ला करण्याची ही तिसरी घटना असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.