
जुन्नर : महाराष्ट्र शासन पाटी लावून थकीत कर्ज वसुली प्रकरणी
जुन्नर : पतसंस्थेच्या खासगी वाहनावर वसुली अधिकाऱ्याने महाराष्ट्र शासन अशी पाटी लावून थकीत कर्ज भरण्यासाठी कर्जदारांना दमदाटी व धमकी दिली. या कारणावरून जुन्नर न्यायालयाच्या आदेशावरून पोलीसांनी संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची फिर्याद बाळासाहेब ज्ञानदेव कोंडे, रा. धामणखेल ता.जुन्नर यांनी जुन्नर न्यायालयात दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने ३ ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशान्वये जुन्नर पोलीस ठाण्यात कुलस्वामीनी को-ऑप. क्रेडिट सोसायटी वाशी,नवी मुंबई जुन्नर शाखेच्या विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असल्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले. हा गुन्हा दाखल झाल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
कोंडे यांच्या फिर्यादीत संस्थेच्या खासगी वाहन क्रमांक एम.एच.१४ जी एस ९५०५ या गाडीवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावून थकीत कर्ज रक्कम भरावे यासाठी कर्जदारांना तसेच फिर्यादी कोंडे यांना शिवीगाळ व दमदाटी करून धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे कोंडे हे एका कर्ज प्रकरणात जमीनदार असल्याने त्या कर्जदाराची थकीत कर्ज रक्कम भरण्यासाठी वसुली अधिकारी त्यांच्या घरासमोर ता. ५ फेब्रुवारी रोजी आले होते यावेळी ही घटना घडली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
Web Title: Junnar Maharashtra Government Case Overdue Loan Recovery
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..