Cow Slaughter Case: जुन्नरमध्ये माई मोहल्ल्यात गोवंश कत्तलीवर पोलिसांची धडक कारवाई; २७० किलो गोमांस जप्त, आठ जणांवर गुन्हे दाखल

जुन्नरच्या माई मोहल्ल्यात गोवंश कत्तलीवर पोलिसांचा धडक छापा; २७० किलो गोमांस जप्त, आठ जणांवर गुन्हे, तिघांना पोलिस कोठडी
Three accused have been arrested while police have launched a search for the remaining suspects in the case.

Three accused have been arrested while police have launched a search for the remaining suspects in the case.

sakal
Updated on

जुन्नर : जुन्नर शहरातील माई मोहल्ला या ठिकाणी गोवंश कत्तली विरोधात जुन्नर पोलिस ठाण्याकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये गोवंश कत्तल करून ठेवण्यात आलेले 270 किलो एवढ्या वजनाचे गोवंश हस्तगत करण्यात आले आहे. गुरुवार ता. 16 रोजी पहाटेच्या सुमारास सदरची कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून तिघांना अटक करून जुन्नर न्यायालयात सादर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे तर या कारवाईदरम्यान जुन्नर पोलिस ठाण्यात आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल असलेला मोहसिन इकबाल अत्तार याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com