esakal | शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना दणका
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे 45 लाख रुपयांची रक्कम न दिल्यामुळे तीन व्यापाऱ्यांचे टोमॅटो खरेदी व विक्रीचे परवाने जुन्नर बाजार समितीने रद्द केले आहेत. 

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना दणका

sakal_logo
By
रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे 45 लाख रुपयांची रक्कम न दिल्यामुळे तीन व्यापाऱ्यांचे टोमॅटो खरेदी व विक्रीचे परवाने जुन्नर बाजार समितीने रद्द केले आहेत. या व्यापाऱ्यांच्या विरोधात जुन्नर न्यायालयात दावा दाखल केला आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली. 

धक्कादायक, पूर्व हवेलीतील सहा वर्षीय मुलासह वडील कोरोनाबाधित  

महेश मधुकर शिंगोटे (शिवनेर टोमॅटो सप्लायर्स), संदीप सखाराम काफरे (साईप्रसाद टोमॅटो सप्लायर्स), सुजित सुभाष चव्हाण, मदतनीस सूरज दीपक अडसरे (मुक्ताई ट्रेडिंग कंपनी) या व्यापाऱ्यांचे खरेदी व विक्रीचे परवाने जुन्नर बाजार समितीने रद्द केले आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजारात टोमॅटो खरेदी विक्रीचे खुल्या पद्धतीने लिलाव होत असतात. बाजार समितीच्या नियमानुसार टोमॅटो खरेदी केल्यानंतर त्याच दिवशी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना पैसे देणे बंधनकारक आहे. मात्र, या व्यापाऱ्यांनी काही शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून टोमॅटो उधारीवर खरेदी केले. त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ केली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

याबाबतची माहिती शेतकऱ्यांनी बाजार समितीला दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना धनादेश दिले. मात्र, ते न वटल्याने शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती बाजार समितीला दिली. संचालक मंडळाने याबाबतची चौकशी केली असता संबंधित व्यापाऱ्यांनी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे 45 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तीन व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. 

loading image
go to top