Pune Crime: उबेर चालकाचा खून करणाऱ्यास पोलीसांनी ठोकल्या बेड्या; जुन्नर तालुक्यात खळबळ, तपासाची चक्र फिरली अन्..

Accused Arrested for Uber Driver murder in Junnar taluka: उबेर चालकाच्या खुनाचा उलगडा; आरोपीस अटक, जुन्नर तालुक्यात खळबळ
Uber Driver Murder Mystery Solved; Police Arrest Suspect in Junnar

Uber Driver Murder Mystery Solved; Police Arrest Suspect in Junnar

esakal

Updated on

-पराग जगताप

ओतूर: ओतूर (ता.जुन्नर) येथील पोलिसांनी उबेर चालकाचा खुन करणाऱ्या आरोपीस अटक केली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक एल जी थाटे यांनी दिली. यात नासीर अहम्मद सलामतुल्ला अन्सारी वय.२६ मुळ रा. शेरकोट ता. धामपुर जि. बिजनोर राज्य-उत्तर प्रदेश सध्या रा. रूम नं. १७७१, समता नगर, सेक्टर नं. १, ऐरोली नाका, गणेश बार जवळ, नवी मुंबई जि.ठाणे यांचा खून झाला असून याबाबत मयताचा भाऊ मोहम्मद अमिर सलामतुल्ला अन्सारी यांनी ओतूर पोलिसात गुन्हा दाखल केला होता. या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी आदर्श चंद्रकांत भालेराव वय २१, रा. संकेश्वर किस्टल सोसायटी, गणेश विदयालया जवळ टिटवाळा ईस्ट ता. कल्याण जि. ठाणे यांस अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com