Junnar News : अदानीच्या प्रस्तावित पंप्ड स्टोरेज प्रकल्पाविरोधात जुन्नरमध्ये संघर्ष समितीची स्थापना; शंभर टक्के विरोधाचा निर्धार

नाणेघाट परिसरातील १,५०० मेगावॉट जलविद्युत प्रकल्पाविरोधात आदिवासी नागरिक एकवटले; ५ ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Tribal residents and local villagers in Junnar have formed the ‘Sahyadri Vachva Sangharsh Samiti’ to oppose Adani Renewable Energy’s proposed 1,500 MW pumped storage hydroelectric project near Naneghat.

Tribal residents and local villagers in Junnar have formed the ‘Sahyadri Vachva Sangharsh Samiti’ to oppose Adani Renewable Energy’s proposed 1,500 MW pumped storage hydroelectric project near Naneghat.

Sakal

Updated on

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील नाणेघाट परिसरातील अंजनावळे परिसरात अदानी रिन्यूएबल एनर्जी फिफ्टी-टू लिमिटेड, अहमदाबाद यांच्यावतीने प्रस्तावित असलेल्या १,५०० मेगावॉट क्षमतेच्या 'पंप्ड स्टोरेज' जलविद्युत प्रकल्पाला स्थानिक नागरिकांसह पश्चिम आदिवासी भागातील नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या प्रकल्पाला शंभर टक्के विरोध करण्याचा ठराव पारित करून प्रकल्पा विरोधात लढा देण्यासाठी सह्याद्री वाचवा संघर्ष समिती जुन्नर तालुका या समितीची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते किरण लोहकरे यांनी दिली. याबाबत जुन्नर येथील आदिवासी विकास प्रबोधिनी येथे रविवार ता. 2 रोजी बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पाला विरोध करण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com