

Innovative Method to Deter Leopards
Sakal
नारायणगाव : नारायणगाव (ता. जुन्नर) वनपरिक्षेत्रात बिबट्यांची वाढलेली संख्या मोठी डोकेदुखी ठरली आहे. बिबट नियंत्रणासाठी केलेल्या विविध उपाययोजना अपुऱ्या पडत आहेत. पकडलेले बिबटे कुठे ठेवायचे? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बिबट घराजवळ येऊच नये, यासाठी जुन्नर वनविभागाच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर प्रथमच बेंगॉल टायगरच्या मूत्राचा (युरीन) वास असलेल्या ‘ॲनिमल आउट’ या द्रव्याचा वापर नारायणगाव वनपरिक्षेत्रातील वारूळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील चिमणवाडी येथे केला आहे. त्यामुळे रोज गोठा व घराजवळ येणारा बिबट्या मागील पाच दिवसांपासून फिरकलाच नाही.