

Frequent Bus Breakdowns on Khodad Route
sakal
अशोक खरात
खोडद : मंगळवारी (दि.११ नोव्हेंबर) दुपारी दोनच्या सुमारास नारायणगाव खोडद रस्त्यावरील गव्हाळी मळ्यात ही बस बंद पडली.यामुळे बसमधील विद्यार्थी व नागरिक रस्त्यावर उभे राहून खोडदकडे जाणाऱ्या वाहनांना हात करून इच्छित स्थळी पोहचण्यासाठी प्रयत्न करताना दिसत होते. नादुरुस्त बस प्रवाशांच्या वाहतुक सेवेसाठी वापरली जात असल्याने प्रवाशांच्या वाहतुकीचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.