

Loan distribution to member farmers of Kale, Kusur and Datkhilewadi societies; Guidance by Director Adv. Sanjay Kale.
Sakal
जुन्नर : जुन्नर तालुक्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. शनिवार ता. 3 रोजी जिल्हा बँकेचे संचालक अँड संजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काले, कुसुर व दातखिळेवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या सभासद शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती बँकेचे समन्वयक अधिकारी सुभाषराव कवडे व विभागीय अधिकारी बाळासाहेब मुरादे यांनी दिली.