

Junnar court verdict in Pune molestation case
esakal
पुणे: पाण्याच्या टाकीजवळ कपडे धुणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पाठीमागून मिठी मारून विनयभंग करणाऱ्या आरोपी रमेश सखाराम दाभाडे याला जुन्नरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षे कारावासाची कठोर शिक्षा सुनावली आहे. एक हजार रुपये दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.