होम क्वारंटाइन असताना बाहेर फिरण्यापूर्वी हे वाचा... 

दत्ता म्हसकर
गुरुवार, 21 मे 2020

होम क्वारंटाइनचा आदेश झुगारून जुन्नर शहरात खुले आम फिरणाऱ्या व्यक्तीवर नगरपालिकेने कारवाईचा बडगा उचलला आहे. 

जुन्नर (पुणे) : होम क्वारंटाइनचा आदेश झुगारून जुन्नर शहरात खुले आम फिरणाऱ्या व्यक्तीवर नगरपालिकेने कारवाईचा बडगा उचलला आहे. 

यूपीला निघालेलं जोडपं म्हणतंय, "हालात सामान्य हुए तो लौटेंगे...'  

होम क्वारंटाइनचा शिक्का असलेली एक व्यक्ती आज (ता. 21) जुन्नरमधील बाजारपेठेतून फिरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याचा होम क्वारंटाइनचा आदेश रद्द करण्यात करून संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर यांनी सांगितले. होम क्वारंटाइन केलेल्या व्यक्ती गावात फिरत असल्याची तक्रार उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी यांनी केली होती. अशा व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करणारे लेखी निवेदन त्यांनी नगर पालिका प्रशासनास दिले होते. त्यानंतर ही कारवाई झाली आहे. 

बारामतीकरांनो, खरेदीचे प्लॅन करताय? आता या आहेत अटी...  

मुंबई- पुण्यात कोरोनाची संख्या वाढत आहे. त्यामुळे तेथून जुन्नरमध्ये येणाऱ्यांची संख्या गेल्या काही दिवसात दररोज वाढत आहे. गेल्या दोन दिवसात आलेल्या 75 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे; तर आज दहा जण जुन्नरमध्ये दाखल झाले आहेत. एकूण 237 जण होम क्वारंटाइन आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जुन्नरमधील विविध सहकारी गृहरचना सोसायटीत अनेकांचे प्लॅट आहेत; तर काहींचे स्वतंत्र बंगले आहेत. येथे ही मंडळी मुक्कामास आहेत. कोरोनाबाधित क्षेत्रातून आल्यानंतर त्यांना रीतसर होम क्वारंटाइन करण्यात येते. शिक्के मारून नोटीस बजावण्यात येते. मात्र, ही मंडळी घरात न बसता बाजारपेठेतून फिरत असतात. त्यांनी फिरू नये, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती नागरिक व्यक्त करत असल्याने यांना आवर घालण्याची नागरिकांची मागणी आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: junnar- Read this before going out during home quarantine