
जुन्नर : हिरवाईने नटलेले डोंगर-दऱ्या,दुथडी खळखळून वाहणारे ओढे-नाले आणि उंचावरून कोसळणारे पांढरे शुभ्र फेसळणारे धबधबे यामुळे जुन्नरच्या आदिवासी भागातील परिसर बहरला आहे. निसर्गप्रेमींसाठी हा भाग एक अनमोल ठेवा ठरत आहे. यामुळे पर्यटन तालुक्यातील पर्यटकांची संख्या वाढत आहे.