

Save Sahyadri Conference Junnar
esakal
जुन्नर : सह्याद्रीच्या कुशीत प्रस्तावित असलेल्या पंप स्टोरेज प्रकल्पांना विरोध करण्यासाठी पेसा कायद्याने ग्रामसभेला दिलेल्या अधिकारांचा प्रभावीपने वापर करावा. पेसा क्षेत्रातील व विशेषतः प्रकल्पाने बाधित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींनी प्रकल्पाच्या विरोधाचे ठराव करून जिल्हा प्रशासनाकडे पाठवावे. जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील ग्रामस्थानी सुरू केलेल्या या लढ्याला व्यापक स्वरूप देऊन राज्यातील अशा प्रकारच्या सर्व प्रकल्पाविरोधात लढा उभारण्याचे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले.