Pune News: पोषण आहारासाठी दिलेल्या वाटाण्याला भुंगे अन् कीड; जुन्नरमधील शाळांमध्ये निकृष्ट धान्याचा धक्कादायक प्रकार

Insect Infested Peas Found In Junnar School Midday Meals: जुन्नर तालुक्यात पोषण आहारासाठी किडकिडीत वाटाण्याचा पुरवठा; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी सुरू असलेल्या खेळावर पालक-शिक्षक संतप्त, प्रशासनाच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह
Poor Quality Peas Supplied For Midday Meals In Junnar Schools In Pune District Raises Serious Questions Over Student Health

Poor Quality Peas Supplied For Midday Meals In Junnar Schools In Pune District Raises Serious Questions Over Student Health

sakal

Updated on

-सिद्धार्थ कसबे

योजनेच्या अंमलबजावणीवरच पुणे जिल्ह्यात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सप्टेंबर महिना उजाडला तरी जिल्ह्यातील काही शाळांमध्ये पोषण आहारासाठी आवश्यक धान्याचा पुरवठा झालेला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आहारापासून वंचित ठेवू नये, यासाठी काही शाळांना उसनवारी करून विद्यार्थ्यांची भूक भागवावी लागत आहे. दुसरीकडे, काही शाळांमध्ये पुरवठा झालेले धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. धान्याची गुणवत्ता, साठवणूक, स्वच्छता आणि आहार तयार करण्याच्या पद्धतीबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या योजनेतच पुरवठ्याचा गोंधळ आणि गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासनाच्या देखरेखीवरही बोट ठेवले जात आहे. नियमित व दर्जेदार आहार मिळणे हा विद्यार्थ्यांचा हक्क असताना, त्यासाठी शाळांनाच धडपड करावी लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com