जुन्नरला विकेंड लॉकडाऊनला दोन्ही दिवस चांगला प्रतिसाद

जुन्नरला विकेंड लॉकडाऊनला दोन्ही दिवस चांगला प्रतिसाद

जुन्नर : विकेंड लॉकडाऊनला जुन्नर तालुक्याच्या शहरी व ग्रामीण विभागात चांगला प्रतिसाद मिळाला. एरव्ही गजबज असणाऱ्या बाजार पेठा, बस स्थानक व परिसर तेथे दोन्ही दिवस शुकशुकाट होता. नागरिकांनी घरात राहणे पसंद केले. औषधोपचार, लसीकरण यासाठीच नागरिक घराबाहेर पडताना दिसत होते.

एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासून कोरोनाच्या रुग्णांची दररोजची सरासरी शंभरहुन अधिक झाली आहे. दहा एप्रिल पर्यत एकूण १ हजार १७९ रुग्णांची नोंद झाली आहे यात जुन्नर नगर पालिका क्षेत्रातील ७९ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ८ हजार ६३८ इतकी असून यापैकी ७ हजार१५३ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण २८० जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे तर १ हजार १९५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. वाढत्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनाचे नियम पाळत नागरिकांनी लॉकडाऊन यशस्वी केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लॉकडाऊनला व्यापारी मंडळींचा विरोध आहेच मात्र कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विकेंड लॉकडाऊनला त्यांनी पाठींबा दिला आहे.

लेण्याद्री व ओझर येथे कोविड सेंटर असून येथे सौम्य लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यात येतो तर नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात गंभीर स्वरूपाच्या रुग्णांवर उपचार करण्यात येतो याशिवाय १७ खासगी कोविड सेंटर मध्ये उपचाराची सुविधा आहे. मात्र वाढत्या संख्येमुळे ही अपुरी ठरत आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड शिल्लक नसणे,रॅमिडीसीवर इंजेक्शनचा तुटवडा आदी मुळे रुग्णाचे नातेवाईकांना मनस्ताप सोसावा लागत आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com