

Supreme Court
sakal
पुणे - वकिली व्यवसायात कार्यरत असलेल्या संघटनांत महिलांनाही प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. राज्य वकील परिषदांमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा आरक्षित ठेवाव्यात, असा आदेश न्यायालयाने दिला. यापैकी २० टक्के जागा निवडणुकीद्वारे, तर १० टक्के जागा थेट नियुक्तीद्वारे भरण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.