
पुणे शहर हादरवून टाकणाऱ्या पोर्शे अपघात प्रकरणात आज बाल न्याय मंडळाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. पोलीस विभागाने आरोपी अल्पवयीन असूनही त्याच्यावर सज्ञान म्हणून खटला चालवावा, अशी मागणी केली होती. मात्र न्याय मंडळाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. यानंतर आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.