Pizza
Pizzaesakal

Juvenile Reformatory : आता पिझ्झा नव्हे, पोळी-भाजी मिळणार

अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात पहिल्या दिवशी सकाळी नाश्त्यात पोहे आणि दुपारच्या जेवणात पोळी-भाजी देण्यात आली.

पुणे - अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात पहिल्या दिवशी सकाळी नाश्त्यात पोहे आणि दुपारच्या जेवणात पोळी-भाजी देण्यात आली. त्याला घरातील खाद्यपदार्थ देण्यास मनाई करण्यात आली आहे. मद्य पार्टीत ४८ हजार रुपये उडविणाऱ्या आणि पोलिस ठाण्यात पिझ्झावर ताव मारणाऱ्या आरोपीला आता बाल सुधारगृहातील पोळी-भाजीवर समाधान मानावे लागणार आहे.

कल्याणीनगर परिसरात या अल्पवयीन आरोपीने दारूच्या नशेत भरधाव मोटारीने धडक दिल्याने तरुण-तरुणीला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर अल्पवयीन आरोपीला पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यावेळी पोलिस ठाण्यात त्याच्यासाठी पिझ्झा मागविण्यात आला होता. पिझ्झाची ऑर्डर देणाऱ्या व्यक्तीचा अद्याप तपास झालेला नाही.

बाल न्याय मंडळाने त्याला लगेचच जामीन मंजूर केला होता. त्यावर समाजातील सर्व स्तरातून पोलिसांसह प्रशासकीय यंत्रणांवर मोठी टीका झाली. पोलिसांनी याबाबत निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी बाल न्याय मंडळाकडे अपील दाखल केले होते. बाल न्याय मंडळाने अल्पवयीन आरोपीची १४ दिवसांसाठी बाल सुधारगृहात रवानगी केली.

त्यानंतर आज गुरुवारी सकाळी नाश्त्यात पोहे, दूध, अंडी देण्यात आली. त्याचे समुपदेशन करण्यात आले. दुपारी आणि रात्री पोळी-भाजी असे साधे जेवण दिले गेले. पुढील दोन आठवडे बाल सुधारगृहातील नियमानुसार साध्या जेवणावरच दिवस काढावे लागणार आहेत. तसेच, बाल सुधारगृहातील त्याची वर्तणूक कशी आहे, हेही तपासले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com