
पुणे : पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ‘ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल’ सुरू करण्यात येणार असून, या शाळेसाठी पुणे जिल्हा परिषद, राज्य शासन आणि क्रिस्टल हाऊस इंडिया या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेमध्ये सामंजस्य करार झाला आहे. हा करार शनिवारी (ता. १४) पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री दादा भुसे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, क्रिस्टल हाऊस इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेसन मॅथ्यू यांच्या उपस्थितीत झाला.